Posts

सृजनेतेचा आनंद

Image
                                                              सृजनेतेचा आनंद काल रात्री अचानक एकीचा फोन आला आणि पलीकडून फक्त रडण्याचा आवाज. कोण आहे हे कळले होते, काय झालय तेही न बोलता कळले होते, आता पुढे काय हाच प्रश्न होता. मी अनेक सेवा क्षेत्रातील किशोरी विकास कार्यक्रमाचे, अभ्यास गटाचे, अभ्यास काय असतात हे मध्यंतरी वाचत होते आणि सगळीकडे पाळी हा विषय अधिक विस्तृत प्रमाणात सांगितला होता. त्यातील शास्त्र हे मुलीना माहिती होतच असते, लहानपणापासून घरातील आई, बहिण, आजी, मावशी, काकू अशा सगळ्यांकडून  कळलेले असते. भारतात तर त्याला प्रत्येक प्रांतात एक वेगळे उत्सवाचे स्वरूपही असते. पहिली पाळी वय १२  ते १६, सध्या अजून थोडे लहान वयात येते. शास्त्रीय रित्या पहिले तर एवढे काय कौतुक, मुलगा वयात येतो तेव्हा त्याचे कुठे करतो कौतुक. तो काय वयात येतो, चिडचिड करतो , थोडेसे रागवणे आणि मग खरंच मोठा होतो आणि कधीतरी आईचीच काळजी घ्यायला  लागतो.  पण मुलगी वयात येणे हा उत्सव आहे. भारतात मध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रथा आहेत. प्रत्येक देशाची अशी वेगळी पद्धत आहे.  पूर्वीच्या काळी हेच तिच्या लग्नाचे वय होते त्यामुळे